औरंगाबाद : चोरीच्या ट्रकची विक्री केल्याप्रकरणी MIM च्या नगरसेवकाला बेड्या
Continues below advertisement
चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याप्रकरणी औरंगाबाद महापालिकेतील एमआयएम नगरसेवक शेख जफर शेख अख्तरला बेड्या ठोकण्यात आल्यात. भिवंडी गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. ट्रक आणि डम्पर चोरी करुन ते बनावट कागदपत्रांच्या आधारे नव्या ग्राहकांना विक्री करणाऱ्या टोळीचा भिवंडी गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात पर्दाफाश केला आहे. आरोपींकडून 50 ते 100 ट्रक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement