औंरगाबाद | एमआयएम आणि भारिप राज्यातील निवडणुका एकत्र लढणार
एमआयएम आणि प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ हे राज्यात युती करुन निवडणुका लढणार आहेत. गांधी जयंतीला म्हणजेच 2 ऑक्टोबरला औरंगाबादेत जबिंदा लॉन्सवर युतीची पहिली एकत्र सभा होणार आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी याबाबत माहिती दिली.