औरंगाबाद : शहरात गॅस्ट्रोचं थैमान, महापौरांचे चौकशीचे आदेश

Continues below advertisement
गॅस्ट्रोमुळं तब्बल 2600 रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये अंथरूण पकडल्यानंतर औरंगाबादच्या महापौरांनी चौकशीचे आदेश दिलेत. चौकशी पुर्ण करून उद्या संध्याकाळपर्यंत अहवाल सादर कऱण्याचे आदेश पालिका आयुक्तांना देण्यात आलेत. परवा रात्रीपासून औरंगाबादच्या छावणी परिसरातील नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झालीय. दोन दिवसांत गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या 250 वरून 2100 पर्यंत पोहचल्यानं आरोग्य विभागाची झोप उडालीय. दरम्यान ड्रेनेजचं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळल्यामुळं गॅस्ट्रोची साथ पसरल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram