औरंगाबाद : बाळासाहेब सराटेंना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं

Continues below advertisement
मराठा आरक्षणाची बाजू ठामपणे मांडणाऱ्या बाळासाहेब सराटे यांनाच काळं फासण्यात आलं आहे. सराटे यांना दुसरं तिसरं कोणी नाही तर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीच काळं फासलं.

बाळासाहेब सराटे यांच्या एजन्सीला आरक्षण सर्व्हेचं काम दिल्याने, त्यांना विरोध होत आहे. त्या वादातूनच सराटे यांना काळं फासल्याचं सांगण्यात येत आहे.

बाळासाहेब सराटे हे मराठा आरक्षणाचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. मराठा आरक्षण का गरजेचं आहे याची त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली.  लेख, ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली मतं व्यक्त केली आहे. शिवाय विविध वाहिन्यांवरील चर्चांमध्ये सहभागी होत त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram