Water Shortage | हंडाभर पाण्यासाठी तब्बल 14 किमी रेल्वेचा प्रवास | औरंगाबाद | ABP Majha
हंडाभर पाण्यासाठी नाशिकमध्ये महिलांना कसरत करुन विहिरीत उतरावं लागत असल्याचं आपण पाहिलं. एक हंडा पाण्यासाठी औरंगाबादमध्ये रस्त्यावर टाकलं जाणारं पाणी हंड्यात भरताना पाहिलं. दुष्काळाचं भयाण चित्र दाखवणारी आणखी एक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. एक कळशी पाण्यासाठी जीव धोक्यात घालून नागरिकांना रेल्वेने 14 किलोमीटर प्रवास करावा लागत आहे. औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी स्टेशनवर हैदराबाद-औरंगाबाद पॅसेंजरची वेळ झाली, की हातात हंडा घेऊन ट्रेनची वाट पाहणारी माणसं 'रेल्वे आली, पाणी भरायला चला...' अशा हाका-आरोळ्या देताना ऐकू येतात. त्यानंतर ट्रॅकशेजारी असलेले अनेक जण हंडा-कळशा घेऊन रेल्वेच्या दिशेने धाव घेतात.