औरंगाबाद : विद्यार्थी सुविधांपासून वंचित, शिवसेनेने भर उन्हात क्रीडा अधिकाऱ्यांना धावायला लावलं

क्रीडा संकुलात खेळाडूंना आवश्यक सुविधा मिळत नसल्याने शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेने अधिकाऱ्यांनाच भर उन्हातून पळायला लावले.

औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंना हॉस्टेलवर सुविधा मिळत नाहीत. मैदानावरील माती उडत असल्याने तोंडावर रुमाल बांधून खेळाडूंना पळावं लागतं. यावर जाब विचारल्यानंतरही अधिकारी ऐकत नसल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी भर उन्हात क्रीडा अधिकाऱ्यालाच पळवल्याची घटना समोर आली आहे.

मुले उपाशीपोटी मैदानावरील धुळीत सराव करतात, हे कळल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संकुलात धाव घेतली. सलग तिसऱ्यांदा गेल्यावरही उपसंचालक राजकुमार महादवाड भेटले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कार्यालयाला शिवसैनिकांनी कुलूप ठोकले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola