औरंगाबाद | कर्णपुरा देवीच्या यात्रेला अलोट गर्दी
नवरात्रीनिमित्त औरंगाबाद शहरात कर्णपुरा देवीची यात्रा भरते. या यात्रेला कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांची गर्दी दिसतेय. कर्णपुरा देवीची जत्रा म्हणजे संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक प्रकाशयोजना, मोठ मोठे पाळणे, खेळणे आणि त्यात मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती. कर्णपुरा देवीची आणि या यात्रेची काही विहंगम दृश्यं एबीपी माझा खास तुमच्यासाठी घेऊन आला आहे.