औरंगाबाद : आज सकाळी दहा वाजता शिंदेंच्या पार्थिवावर अंत्यविधी

Continues below advertisement
काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मराठा आंदोलकांनी गंगापूर पोलीस स्टेशनसमोरचं ठिय्या आंदोलन मागे घेतलं आहे. गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. आणि काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत, भावाला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी यांचं लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे. दरम्यान, आज सकाळी १० वाजता मृत आंदोलक काकासाहेब शिंदे याच्या पार्थिवावर कायगाव टोका इथं अंत्यविधी होणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram