औरंगाबाद : चोर शिरल्याच्या अफवांचं पेव, वैजापुरात आठवडाभर इंटरनेट बंद
Continues below advertisement
औरंगाबादेत दोन गावांची इंटरनेट सुविधा आठवडाभर काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांत चोरांच्या अफवांचं पेव फेटल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील गावांची इंटरनेट सुविधा आज (शुक्रवार 15 जून)पासून पुढील गुरुवार (21 जून) चे रोज संध्याकाळी सात वाजल्यापासून पहाटे दोन वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
चोरांच्या अफवांचं पेव फुटल्यामुळे शांतता अबाधित राहावी म्हणून वैजापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. चोरांच्या अफवेमुळे राज्यात इंटरनेट बंद करण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे.