औरंगाबाद : तब्बल 20 डॉक्टरांची पदवी उच्च न्यायालयाच्या निर्णयावरुन रद्द
Continues below advertisement
एबीबीएस झालेल्या तब्बल 20 डॉक्टरांची पदवी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद विद्यापीठानं रद्द केली आहे. जळगावच्या उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातले हे सगळे विद्यार्थी आहेत. 2012 मध्ये सीईटी परीक्षेत कमी गुण मिळवूनही या सर्वांना प्रवेश देण्यात आला होता. याशिवाय महाविद्यालयाची मान्यता आणि संलग्नता रद्द कऱण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या निर्णयामुळं या सर्व विद्यार्थ्यांना आपली पदवी गमवावी लागणार आहे. त्यामुळं आता या उमेदवारांची पात्रता घसरुन थेट 12 वी झाली आहे. परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठच्या तेजस्विनी फड या विद्यार्थिनीला जास्त गुण मिळूनही प्रवेश देण्यात आला नव्हता. यानंतर तिनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर प्रकरणाचा तपास करण्यात आला. आणि आता दोषींवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
Continues below advertisement