Haribhau Bagde | दहावीच्या विद्यार्थिनीची कैफियत घेऊन हरिभाऊ बागडे बोर्डाच्या कार्यालयात | ABP Majha
दहावीच्या विद्यार्थिनीची उत्तर पत्रिका पाहण्यासाठी विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी तीन तास औरंगाबाद एसएससी बोर्डात ठाण मांडलं,. मात्र तीन तासानंतरही बागडेंना उत्तर पत्रिका पाहता आली नाही.
दहावीच्या हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिकेचं पान फाडल्या प्रकरणी अंजली गवळी या विद्यार्थींनीचा निकाल राखीव ठेवला. मात्र फाडलाच नाही आसा दावा विद्यार्थिनीनं केला. पण बोर्डानं तिचं ऐकलं नाही. त्यामुळे विद्यार्थिनीनं थेट विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्यानंतर बागडे यांनी बोर्डाचे कार्यालय गाठलं. आणि विद्यार्थिनीची उत्तरपत्रिका दाखविण्याची मागणी केली.नियमानुसार उत्तरपत्रिका देता येत नसल्याचं कारण दिल्यानंतर जोपर्यंत उत्तरपत्रिका मिळत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका बागडे यांनी घेतली. परिणामी अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती. तीन तास हा गोंधळ बोर्डात सुरु होता. मात्र बागडे यांना रिकाम्या हाती परतावं लागलं.