औरंगाबाद | ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी
औरंगाबादचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणेशाची मोठ्या भक्तीभावात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या गणरायाची प्रतिष्ठापना झाल्याशिवाय औरंगाबादेतील कुठल्याही गणपतीची स्थापना होत नाही अशी प्रथा आहे. त्यामुळे संस्थान गणपतीच्या पुजेला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. खासदार चंद्रकांत खैरे यांच्य हस्ते संस्थान गणेशाची प्रतिष्ठापना झाली.