माझा विशेष : औरंगाबादकरांची कचराकोंडी कधी फुटणार?
Continues below advertisement
औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न पेटण्याची चिन्हं आहेत, कारण 13 दिवसानंतरही शहरातला कचरा अजूनही जागेवर आहे. आणि त्याचवेळी कचरा टाकण्यासाठी आलेली महापालिकेची गाडी मिटमिटा गावातील स्थानिकांनी पेटवून दिली आहे. थोड्याच वेळापूर्वी ही घटना घडली आहे. औरंगाबादपासून 15 किलोमीटरवर असलेल्या नारेगावच्या कचरा डेपोत सध्या कचरा टाकला जातो, मात्र तिथल्या ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केल्यानं मोठा पेच निर्माण झाला आहे. कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होत नसल्यानं आणि त्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यानं रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढल्याचा आरोप नारेगावकरांनी केला आहे. या पेचामुळे औरंगाबादचं आरोग्य धोक्यात आलेलं असतानाही आमदार इम्तियाज जलील, अतुल सावे, संजय शिरसाठ आणि खासदार चंद्रकांत खैरे मात्र सुशेगाद आहेत....
Continues below advertisement