औरंगाबाद : शहराची कचराकुंडी, दानवे, हरिभाऊ बागडे, ग्रामस्थांशी चर्चा करणार
Continues below advertisement
औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात कचऱ्याचा प्रश्न एवढा गंभीर झाला आहे, की नागरिकांना तोंडाला रुमाल लावून रस्त्याने चालावं लागत आहे. त्यामुळे महापालिकेने दोन लाख मास्क मागवले आहेत. राजकीय नेते आज नारेगावच्या ग्रामस्थांशी चर्चा करुन कचराकोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
कचरा डेपोच नसल्यामुळे औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. औरंगाबाद शहरात गेल्या 7 दिवसांपासून अभूतपूर्व कचराकोंडी निर्माण झाली आहे. नारेगाव इथल्या डेपोत कचरा टाकला जायचा. मात्र त्याठिकाणी कचरा टाकणं बंद केल्यानंतर पर्यायी जागा उपलब्ध करून घेण्यात औरंगाबाद महापालिकेला अपयश आलं आहे.