औरंगाबाद : कचरा गाड्यांवर दगडफेक, ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री

Continues below advertisement
औरंगाबादेतील कचरा प्रश्नाला हिंसक वळण लागलंय. मिटमिटा आणि पडेगावांमध्ये कचऱ्याच्या गाड्यांवर स्थानिकांनी तुफान दगडफेक केली..यात ५ ते ६ खाजगी गाड्या तर १००हून अधिक दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर काही गाड्या पेटवण्यातही आल्या. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्यात. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत 5 ते 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram