तब्बल 18 दिवसानंतरही औरंगाबादकर कचऱ्यात, पालिका आणि नारेगावकरांमधील वाद कायम
Continues below advertisement
औरंगाबाद शहरात कचराकोंडीचा आजचा 18 वा दिवस आहे. मात्र, अजूनही हा प्रश्न निकाली निघालेला नाही. कोर्टानं आधीच महापालिका प्रशासनावर याबाबत ताशेरे ओढले आहेत. आजही याबाबतची सुनावणी होणार आहे. दुसरीकडे कचरा टाकायला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असं विभागीय आयुक्तांनी म्हटलं आहे. मात्र, प्रशासनानं आपल्या गावात कचरा टाकू नये यासाठी रात्रभर इथल्या गोलवाडी, तिसगाव भागातल्या ग्रामस्थांनी कडा पहारा देत आहेत. औरंगाबादजवळच्या नारेगाव भागात आधी शहरातला कचरा टाकला जात होता. मात्र, आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्यामुळे नारेगावसह इतर अनेक गावांनी शहरातला कचरा आपल्या हद्दीत टाकू देण्यास विरोध दर्शवला आहे.
Continues below advertisement