औरंगाबाद : गंगापूर साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन
Continues below advertisement
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर सहकारी साखर कारखाना आमच्या ताब्यात द्या या मागणीसाठी शेतकरी थेट काऱखान्यावर धडकले होते. यावेळी काही शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतल्यानं पुढचा अनर्थ टळला.
कारखान्याने जुन्या कर्जाची परतफेड केली नसल्याने कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात आहे. शिवाय बँकेने कारखाना राजाराम फुड्स विकला होता. मात्र, आर्थिक व्यवहार पूर्ण केला नसल्याने हे प्रकरण न्यायालयात पोचले आहे. आज बँकेचे अधिकारी कारखाना ताब्यात घेण्यासाठी आले असता त्यांना शेतकऱ्यांच्या विरोधामुळे पुन्हा माघारी परतावं लागलं.