औरंगाबाद: गंगापुरात खोदकामादरम्यान चांदीच्या नाण्यांनी भरलेलं मातीचं भांड सापडलं

Continues below advertisement
गंगापूर तालुक्यातील नेवरगावमध्ये खोदकाम करताना निजामकालीन चांदीच्या नाण्यांनी भरलेलं एक मातीचं भांड सापडलं आहे. चांदीची नाणी सापडल्यावर खोदकाम करणाऱ्यांनी ते लांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यात वाटाघाटीवरुन वाद झाला. त्यानंतर पोलिसांना ही माहिती मिळाली. पोलिसांनी संबंधितांकडून सव्वा किलो वजनाची 90 नाणी हस्तगत केली आहेत. या नाण्यांचा पंचनामा करण्यात आला असून, सर्व नाणी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी कोषागार कार्यालयात जमा केली. दरम्यान, या ठिकाणी नेमकी किती नाणी सापडली याचा तपास पोलिस घेत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram