औरंगाबाद : सिडको परिसरातील उड्डाणपुलाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव
औरंगाबादमधल्या सिडको परिसरातील उड्डाण पुलाचा नामकरण सोहळा आज पार पडला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव या उड्डाणपुलाला देण्यात आलंय. या कार्यक्रमासाठी महापौर नंदकुमार घोडेले, औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते. दरम्यान या पुलाच्या नामकरणाला विरोध करण्यासाठी निदर्शनंही करण्यात आली. या पुलाला वसंतराव नाईक यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी बंजारा समाजानं धरली होती. मात्र तसं न झाल्यानं बंजारा समाजाकडून निदर्शनं करण्यात आली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर नामकरणाचा कार्यक्रम पार पडला.