औरंगाबाद : जिल्हा न्यायालयाच्या आवारात कुरेशी आणि मेहंदी गटात तुफान हाणामारी
Continues below advertisement
औरंगाबादमधील जिल्हा न्यायालयाच्या आवारात दोन गटात तुफान हाणामारी झाली. आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास खुन प्रकरणातील आरोपी इमरान मेहंदी याला न्यायालयात हजर करण्यात आले. साक्षीदारांच्या साक्ष न्यायालयात तपासल्या जाणार होत्या. यासाठी तेथे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हेदेखील हजर होते. याचदरम्यान न्यायलयाच्या गेटजवळ कोर्टातून बाहेर पडलेल्या एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला केला. लाठाकाठ्या आणि दगड घेऊन कुरेशी गट आणि मेहंदी गट एकमेकांसमोर भिडले.
Continues below advertisement