स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी
Continues below advertisement
औरंगाबादमध्ये कॉपी करताना पकडल्यावर पुन्हा एका विद्यार्थ्याने मुजोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्मचाऱ्याला मारहाण करत त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली.
सतीश राजीव वाघमारे असं कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. सतीश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शारीरिक शिक्षणशास्त्र विभागात एमपीएडचा विद्यार्थी आहे.
औरंगाबादमधील विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात एमपीएड परीक्षेच्या पहिल्याच पेपरमध्ये सतीश कॉपी घेऊन जात होता, त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्याला मज्जाव केला. यामुळे चिडलेल्या सतीशने कर्मचाऱ्याला मारहाण केली.
मारहाण करुन सतीश थांबला नाही, तर दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारण्याची धमकी देत त्याने गोंधळ घातला. या घटनेनंतर भेदरलेल्या प्रशासनाने तातडीने पोलिसांना बोलावलं. या प्रकरणी विद्यार्थ्याची चौकशी सुरु आहे.