औरंगाबाद : मी संकटात असताना पवारांनी मला नेहमीच मदत केली : मनमोहन सिंह

Continues below advertisement
 ‘पवार हे प्रभावी मंत्री होते. मी संकटात असताना त्यांनी मला नेहमीच मदत केली. देशावर आलेल्या विविध संकटांवरही त्यांनी अत्यंत कुशलतेने मात केली आहे.’ अशा शब्दात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं.

शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीवर शेषराव चव्हाण यांनी लिहिलेल्या ‘दी ग्रेट एनिग्मा’ या पुस्तकाचं आज (शनिवार) प्रकाशन करण्यात आलं. औरंगाबादमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या उपस्थिती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

विशेष म्हणजे यावेळी मनमोहन सिंह यांनी शरद पवारांना कर्मयोगी ही पदवी बहाल केली. तसंच देशाच्या आर्थिक सुधारणांचे शरद पवार समान भागीदार असल्याचे गौरवोद्वार मनमोहन सिंहांनी काढले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram