औरंगाबाद : वेरुळमध्ये पोलिसांकडून पर्यटकांची लूट, प्रकार कॅमेऱ्यात कैद
Continues below advertisement
जगप्रसिद्ध वेरुळची लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक दाखल होतात. पण याच पर्यटकांकडून पोलीस पठाणी वसुली करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 200 रुपयांची पावती हवी असल्यास पोलिसांना 400 रुपये द्यावे लागतात आणि औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून ही वसुली करण्यात येते आहे. 200 रुपयांच्या पावतीसाठी 400 रुपये का घेता, असा सवाल पर्यटकांनी केला तर यावेळी पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली आणि पार्किंग वसुलीचं कारण सांगितलं.
Continues below advertisement