औरंगाबाद : नापास विद्यार्थ्यांना पदव्यांचं वाटप, 'बामू'चा भोंगळ कारभार
Continues below advertisement
विद्यापीठानं चक्क नापास झालेल्या विद्यार्थ्य़ांनाच पदवी वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या भीम पराक्रमानं बामू विद्यापीठाची पुन्हा एकदा नाचक्की झालीय. पदवी छापण्याचं कंत्राट एका बाहेरच्या कंत्राटदाराला देण्यात आलं होतं. शेषशायी या कंपणीलामाहिती पुरवतांना विद्यापीठाकडून काही नापास विद्यार्थ्यांची सुद्दा नाव देण्यात आली. त्यामुळं त्यांच्या पदव्या सुद्धा छापल्या गेल्या, हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर विद्यापीठातील अधिका-यांचे धाबे दणाणले. कुलगूरूंनी याप्रकाराची गंभीर दखल घेतली असून, या प्रकाराच्या चौकशीसाठी उच्च स्तरीय चौकशी नेमली आहे.
Continues below advertisement