औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोप सभेला परवानगी नाकारली
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला औरंगाबादच्या आयुक्त कार्यालयासमोर सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र येत्या 3 तारखेला विभागीय आयुक्त कार्यालयासमोरच हल्लाबोल यात्रेचा समारोप होईल, यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. आयुक्त कार्यालयासमोरच्या सभेला परवानगी नाकारली असली तरी, आमखास मैदानावर सभा घेण्यास पोलिसांनी सुचवलं आहे. मात्र केवळ राजकारण करुन सरकार या ठिकाणी सभेला परवानगी देत नसल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. हल्लाबोल यात्रेच्या समारोपाला शरद पावारांची उपस्थिती राहणार आहे.
Continues below advertisement