औरंगाबाद : कचराकोंडीवरुन हायकोर्टाने औरंगाबाद महापालिकेला फटकारलं

Continues below advertisement

औरंगाबाद शहरातल्या कचराकोंडीवरुन खंडपीठाने पालिका प्रशासनावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत ताशेरे ओढले आहेत. तसंच या प्रकरणात राज्य सरकारने हस्तक्षेप करावा असंही कोर्टाने म्हटलंय.
आता या कचराकोंडीवर उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे. तसच या सुनावणीदरम्यान पालिका आयुक्तांनाही कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेत. त्यामुळे उद्या सरकार आणि महापालिका कचऱ्याच्या बंदोबस्तासाठी कोणता अॅक्शन प्लान सादर करतात ते बघावं लागेल. गेल्या दहा दिवसांपासून औरंगाबाद शहरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे १५ लाख शहरवासीयांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram