औरंगाबाद : महावितरणाच्या लिपीक परीक्षेत ज्वारीच्या दाण्याएवढ्या इयरफोननं कॉपीचा पराक्रम

सिनेमातल्या मुन्नाभाईलाही लाजवेल अशा पद्धतीनं कॉपी पुरवणाऱ्या टोळीचा औरंगाबादेत पर्दापाश झाला आहे. डोळ्यांना दिसणार नाही, असा अगदी छोट्या इयरफोन कानात बसवायचा, यानंतर बटणाला लावलेल्या छुप्या कॅमेऱ्याद्वारे प्रश्नपत्रिकेचे फोटो दुसऱ्या व्यक्तीच्या लॅपटॉपवर पाठवायचे. आणि तिथूनच फोनद्वारे जे-जे उत्तर येतील, त्याद्वारे पेपर सोडवायचा. अशा पद्धतीनं हे रॅकेट काम करत होतं. काल झालेल्या महावितरणच्या लिपीक भरतीच्या परीक्षेत हा प्रकार उजेडात आला. एका परीक्षार्थींकडून टोळीनं ७ ते ८ लाख रुपये घेतल्याचंही बोललं जातंय. अर्जुन घुसिंगे असं या टोळीच्या सूत्रधाराचं नाव आहे. महत्वाचं म्हणजे घुसिंगेच्या फोनमध्ये काही महावितरणच्या अधिकाऱ्यांचेही नंबर आढळून आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे तार महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबतदेखील जोडले गेले आहेत का? अशी शंका उपस्थित होतेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola