औरंगाबाद : औरंगाबादेतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचार भडकवणाऱ्यांवर कडक कारवाई : मुख्यमंत्री

Continues below advertisement
औरंगाबादमध्ये दोन गटात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या काही कंपन्यांची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तर 15 ते 16 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिली. सध्या औरंगाबाद पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

शहरात काल झालेल्या वादात दोघांचा मृत्यू झाला असून 30 ते 40 जण जखमी झाल्याची माहिती आहे. शिवाय, औरंगाबाद पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. तर सहाय्यक पोलीस आयुक्तांसह दहा पोलीस जखमी झाले आहेत. मात्र या प्रकरणाची नेमकी ठिकणी पडली कुठे, याबाबत अनेक दावे केले जात आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram