औरंगाबाद | 154 PSI नियुक्ती रद्द : हायकोर्टाच्या पर्यायाचा विचार करु: मुख्यमंत्री
Continues below advertisement
नियुक्ती रद्द झालेल्या अनुसूचित जाती जमातीतील 154 पीएसआय प्रकरणी हायकोर्टात जायचं की दुसरा मार्ग काढायचा याबाबत आमचा प्रयत्न सुरु आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. नियुक्ती रद्द झाल्याने मॅटने 154 पीएसआयना त्यांच्या मूळ पदावर पाठवलं आहे. त्यामुळे 9 महिन्यांचं प्रशिक्षण घेऊनही या पीएसआयना आता मूळ पदावर जावं लागलं. त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “मॅटचा निर्णय आला आहे. पण राज्य सरकार त्यातून मार्ग काढत आहे. कारण या पीएसआयनी ट्रेनिंग पूर्ण केलं आहे. त्यामुळे मी विधी व न्याय विभागाला सांगितलं आहे. त्यामुळे हायकोर्टात आव्हान द्यायचं की दुसरा मार्ग काढायचा याबाबतचा आमचा प्रयत्न सुरु आहे".
Continues below advertisement