UNCUT | दुष्काळ भूतकाळ असेल, तो मराठवाड्यातील पुढच्या पिढीला पाहू देणार नाही - मुख्यमंत्री | ABP Majha
मराठवाड्यातील वर्षानुवर्ष सुरु असलेला पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा निर्धार मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यासाठी मराठवाड्यातील प्रमुख धरणे एकमेकांना जोडणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज औरंगाबादच्या लासूर स्टेशन गावच्या चारा छावणीला भेट दिली, त्यावेळी नागरिकांशी साधलेल्या संवादादरम्याने त्यांनी हे आश्वासन दिलं. दुष्काळ दूर करण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे. मराठवाड्यातील दुष्काळ पुढची पिढी पाहणार नाही. तसेच मराठवाड्यातील दुष्काळ भूतकाळ असेल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जनतेला दिला. त्यासाठी उपाययोजनाही सुरु केल्या असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.