औरंगाबाद: चौंढाळ्यातील अभद्र प्रथा, गावात लग्न लावत नाहीत, दुमजली घर नाही
Continues below advertisement
औरंगाबादच्या चौंढाळा गावात चक्क लग्न लागत नाही.. त्यामुळे एखाद्या मुलीचं, किंवा मुलाचं लग्न ठरलं तर त्यांना थेट गावाबाहेर जाऊन लग्न लावावं लागतं.
इतकंच नाही तर गावात दुमजली घरही कुणी बांधत नाही. त्यापुढे जाऊन कहर म्हणजे तुम्हाला इथं जमिनीवरच झोपावं लागतं. गावात कुणाच्याही घरात बाज, कॉट किंवा पलंग नाही.
700 लोकवस्तीच्या चौंढाळ्यात रेणुका देवीचं पुरातन मंदिर आहे. ते माहुरच्या देवीचं उपपीठ म्हणून ओळखलं जातं. आणि देवीवरील श्रद्धेनं किंवा भीतीनं शेकडो वर्षापासून या प्रथा पाळल्या जातायत.