Khaire | निवडणुकीपूर्वी मी हार्ट अटॅकने मेलो का नाही, पराभवानंतर चंद्रकांत खैरेंची भावूक प्रतिक्रिया | ABP Majha
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीपूर्वी हार्ट अटॅक येऊन मी मेलो का नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. चार वेळा खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. आपल्या पराभवावर बोलतांना खैरे म्हणाले की, शिवसेनेत संघटनात्मक बदलाची गरज आहे. ज्यांना मी मोठं केलं त्या सर्वांनी आज माझ्या विरोधात काम केलं, याचं वाईट वाटत आहे.
Continues below advertisement