औरंगाबाद : बाईकला कट मारल्याचा राग, एसटी चालकाला तरुणांची मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरुन काही तरुणांनी औरंगाबादमध्ये बस चालकाला बेदम मारहाण केली आहे. पैठणहून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसला चितेगाव टोलनाक्यावर तरुणांनी अडवलं आणि चालकाला मारहाण केली. दुचाकीला कट का मारला असा जाब विचारत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकरा चितेगाव टोलनाक्यावर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेनंतर दोषी तरुणांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.