औरंगाबाद : आठ लाखांच्या वीज बिलामुळे जगन्नाथ शेळकेंची गळफास घेऊन आत्महत्या, अधिकाऱ्यावर गुन्हा

Continues below advertisement
औरंगाबादमधल्या जगन्नाथ शेळकेंच्या आत्महत्येनंतर आता महावितरणच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 8 लाखाचं वीजबिल पाठवल्यानं जगन्नाथ शेळकेंनी राहत्या घरात गळफास घेतला होता. शिवाय सुसाईड नोटमध्ये यासाठी वितरणला दोषी धरलं होतं. या घटनेनंतर शेळके कुटुंबानं दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. शिवाय नुकसान भरपाई आणि शेळके कुटुंबातल्या एकाला महावितरणमध्ये नोकरीची मागणी केली होती. शिवाय जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोवर मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केला होता. यानंतर आता दोषी अधिकाऱ्यावर मृत्यूला जबाबदार असल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram