औरंगाबाद | MIM नगरसेवक मतीनला मारहाण करणाऱ्या भाजपच्या 5 नगरसेवकांना अटक

Continues below advertisement
औरंगाबाद महापालिकेत एमएमआय नगरसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या 5 नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या निधन शोक प्रस्तावाला एमआयएम नगरसेवक मतीन सय्यद यांने विरोध केला होता. त्यावरुन संतपालेल्या भाजप नगरसेवकांनी मतीन सय्यदला सभागृहातच बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या मारहाण प्रकरणात उपहापौर विजय औताडे, नगसेवक प्रमोद राठोड, राज वानखेडे, रामेश्वर भादवे आणि नगरसेविका माधुरी अदवंत या  5 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या नगरसेवकांना जामीन मिळाला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram