औरंगाबाद : 100 कोटी खर्चून बनवलेल्या अजिंठा आणि वेरुळ लेण्यांची प्रतिकृती धूळ खात

Continues below advertisement
तब्बल 100 कोटी रुपये खर्चून औरंगाबादच्या वेरुळ आणि अजिंठा लेण्याची प्रतिकृती बनविण्यात आलीय. पण सध्या ही कलाकृती धूळखात पडली आहे. कारण पर्यटन विकास महामंडळानं 84 लाख रुपयांचं वीज बिल थकवलं आहे.
त्यामुळे महावितरणनं काल वीज कापलीय.
यापूर्वी अनेकवेळा नोटीस देऊनही एमटीडीसीनं वीज देयकाचा भरणा केला नाही. त्यामुळे अखेर वीज तोडण्याचा निर्णय़ घेण्यात आलाय.
खरं तर औरंगाबाद ही महाराष्ट्रातील पर्यटनाची राजधानी आहे. देशविदेशातून इथं पर्यटक येतात. त्यांच्या सोईसाठी जापान सरकारनं 100 कोटी रुपये खर्चून प्रतिकृती तयार केलीय. पण आता या वास्तू धूळखात पडून आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram