औरंगाबाद : कचराप्रश्न सोडून सहल काढणारे राजकारणी बेजबाबदार : काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार
Continues below advertisement
गेल्या महिनाभरापासून औरंबाद शहर कचराकोंडीत असताना याच कचऱ्यात औरंगाबादकरांना सोडून लोकप्रतिनिधी चक्क सहलीवर गेले आहेत. यात खासदार, आमदार, महापौर यांच्यासह पालिकेतील अनेक पदाधिकारी दोन दिवसांच्या पंजाब दौऱ्यावर आहेत. या सहलीचा व्हीडिओ माझाच्या हाती लागलाय. विशेष म्हणजे हा कोणताही अभ्यास दौरा नसून खास फिरण्यासाठीच हे सर्व नेते गेले आहेत .या सहलीत ते विविध स्थळांना भेटी देणाऱ्या आहेत. दरम्यान, ही सगळी नेते मंडळी सहलीवर गेल्यानं औरंगाबादकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Continues below advertisement