हिंगोली : पावसामुळे गटाराचं पाणी औंढा नागनाथ मंदिरात शिरलं
Continues below advertisement
परतीच्या पावसाने काल रात्री हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे जोरदार हजेरी लावली. तासभर कोसळलेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झालं. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ मंदिरातही या पावसामुळे गटाराचं पाणी शिरल्याचा आरोप करण्यात आला आहे. औंढा नगर पंचायतीकडून गटार नियमित साफ केली जात नसल्याने पाणी तुंबलं. गटार तुंबल्याने गटाराबाहेर घाण पाणी वाहू लागलं. हेच पाणी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नागनाथ मंदिरात शिरलं. गटाराचं घाण पाणी शिरल्याने मंदिरात सर्वत्र घाण पसरली होती.
Continues below advertisement