Asian Games 2018 : नेमबाज संजीव राजपूतची रौप्यपदकाची कमाई
अनुभवी नेमबाज संजीव राजपूतनं जकार्ता एशियाडमध्ये भारताच्या आणखी एका रौप्यपदकाची भर घातली आहे. पुरुषांच्या पन्नास मीटर्स रायफल थ्री पोझिशन प्रकारात संजीवला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. चीनचा ह्यू झिचेन्ग या प्रकारात सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्यानं ४५३.३ गुणांची कमाई केली. संजीवनं ४५२.७ गुणांची नोंद केली.