Asian Games 2018 : आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या सौरभ चौधरीच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया
जकार्ता एशियाडमध्ये आज सकाळी भारतानं तिसरं सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत भारताच्या 16 वर्षांच्या सौरभ चौधरीने सुवर्णवेध घेतला. याच प्रकारात भारताच्या अभिषेक वर्मानं कांस्यपदकाची कमाई केली. 16 वर्षीय सौरभनं एशियाडमध्ये पदार्पणात नव्या विक्रमाची नोंद करून 240.7 गुण मिळवले. अभिषेकने 219.3 गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला. सौरभ चौधरी हा उत्तर प्रदेशातील मेरठचा रहिवासी आहे.
सौरभला सुवर्णपदक मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी काय भावना व्यक्त केल्या आहेत.
सौरभला सुवर्णपदक मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी काय भावना व्यक्त केल्या आहेत.