Asian Games | नेमबाजीत 16 वर्षीय सौरभ चौधरीला सुवर्णपदक तर अभिषेक वर्माला कांस्य
Continues below advertisement
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आणखी एक सुवर्णपदक पटकावलं आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टर नेमबाजीत भारताच्या 16 वर्षांच्या सौरभ चौधरीने सुवर्णवेध घेतला. तिसऱ्या दिवसाचं पहिलं तर भारताच्या खात्यातील हे तिसरं सुवर्णपदक आहे.
दुसरीकडे आणखी एक नेमबाज अभिषेक वर्मानेही कांस्यपदक पटकावलं आहे. 16 वर्षीय सौरभने विक्रमी कामगिरी करत 240.7 गुण मिळवले. तर अभिषेकने 219-3 गुणांसह तिसरा नंबर मिळवला. सौरभ चौधरी उत्तर प्रदेशातील मेरठचा रहिवाशी आहे.