नवी दिल्ली | भाजपचे आमदार आशिष देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
नागपुरातील काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात आमदार आशिष देशमुख यांचा काँग्रेस प्रवेश झाला.
2 ऑक्टोबर रोजी आशिष देशमुख यांनी भाजपसह आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते. आता त्यांनी नवी दिल्लीत जाऊन काँग्रेसमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केलाय. त्याआधी त्यांना राहुल गांधींचीही भेट घेतलीय.
44 वर्षीय आशिष देशमुख हे नागपूरमधील काटोल मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत.