पंढरपूर: आषाढी एकादशी: जाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान
पंढरपुरात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विठूरायाची शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत यंदा पूजेचा मान हिंगोलीच्या जाधव दाम्पत्याला मिळाला. अनिल जाधव आणि वर्षा जाधव यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा केली. जाधव दाम्पत्य हे शेणगाव तालुक्यातील भगवती गावचे रहिवासी आहेत. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा अशी मागणी विठ्ठलाकडे केल्याचं यावेळी जाधव दाम्पत्यानं सांगितलं.