मुंबई : आषाढी एकादशी : भाजपच्या दिंडीला नेत्यांची दांडी
Continues below advertisement
भाजपकडून आषाढी निमित्त दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. मात्र या दिडींत भाजपचा एकही मोठा नेता सामिल झाला नाही. दिंडीआधीच्या पत्रकात रावसाहेब दानवे, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार हे या सोहळ्यात उपस्थित राहतील असं सांगण्यात आलं होती. मात्र यातील एकही नेता दिंडीत सहभागी झाला नाही. त्यामुळं या दिंडीबद्दल मोठ्या नेत्यांना माहिती होती की नाही याबद्दलही शंका उपस्थित केली जातेय.
Continues below advertisement