औरंगाबाद : आषाढी एकादशी : प्रतिपंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी
आषाढीनिमित्त प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या वाळूज पंढरपूरमध्ये भक्तांनी गर्दी केली आहे. औरंगाबाद-अहमदनगर रस्त्यानजीकच हे पंढरपूर वसलं आहे. ज्या भाविकांना पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही, ते भाविक प्रतिपंढरपूरला जाऊन विठुराया चरणी लीन होतात. आज इथं औरंगाबादसह नगरसह राज्यभरातल्या भाविकांनी हजेरी लावली आहे.