श्रीनगर: शहीद औरंगजेब यांच्या हत्येपूर्वीचा व्हिडीओ
जम्मू-काश्मीरच्या पुलवामात भारतीय सैन्याचा राईफलमॅन औरंगजेब याच्या हत्येआधीचा एक व्हीडिओ समोर आला आहे. दहशतवाद्यांनी आधी अपहरण करुन त्याची हत्या केली. या व्हिडीओत दहशतवाद्यांचा चेहरा दिसत नसला तरी ते औरंगजेबाला करत असणारी विचारपूस स्पष्टपणे ऐकू येतेय. मेजर शुक्ला तुझ्यासोबत होते का, समीर टाईगरच्या हत्येत तुझाही सहभागी होता का, असे प्रश्न दहशतवाद्यांनी शहीद औरंगजेबला विचारले आहेत.