Apache Helicopters | अमेरिका बनावटीची 8 अपाचे हेलिकॉप्टर वायुसेनेच्या ताफ्यात, काय आहेत वैशिष्ट्ये? | ABP Majha

Continues below advertisement

भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात आज अमेरिकी बनावटीची आठ 'अपाचे’ हेलिकॉप्टर दाखल झाली आहेत. वायुसेनाप्रमुख बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत आज पठाणकोटमध्ये या नव्या हेलिकॉप्टरचा लोकार्पण सोहळा पार पडला. अपाचे हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे वायुसेनेची ताकद वाढणार आहे. याच बरोबर 'अपाचे’ हेलिकॉप्टरची वापर करणारा भारत हा 15वा देश ठरला आहे.

अमेरिकी वायुसेनेच्या ताफ्यात सध्या या हेलिकॉप्टचा वापर सुरु आहे. इराक युद्ध आणि अफगाणिस्तानात दहशदवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने या अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टरचा वापर केला होता. भारतीय वायुसेनेने सप्टेंबर 2015 मध्ये अमेरिकेच्या बोइंग लिमिटेडसोबत 22 अपाचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार झाला होता. त्यानुसार भारताला चार 'अपाचे’ हेलिकॉप्टर 27 जुलैला मिळाले. त्यानंतर आठ हेलिकॉप्टर सप्टेंबरमध्ये भारताला मिळाले. पुढील वर्षापर्यंत सर्व 22 हेलिकॉप्टर वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होतील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram