VIDEO | 'अपाचे' हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल | एबीपी माझा
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात 'अपाचे' हे अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झालं आहे. अमेरिकेतील अॅरीझोना येथील उत्पादन तळावर हे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. 'अपाचे'ची जगातील सर्वोत्तम हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे.