Anushka Sharma | 'त्या' आरोपांवर अभिनेत्री अनुष्का शर्माचं सणसणीत उत्तर | ABP Majha
बीसीसीआयच्या पैशावर अभिनेत्री अनुष्का शर्मा नवरा विराट कोहलीसोबत क्रिकेट दौऱ्यांवर जात असल्याचा आरोप होत आहे. त्याला अनुष्काने उत्तर दिलंय. मी माझ्या पैशाने विमानाचा प्रवास, हॉटेलचं बुकींग तसंच क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी तिकीट विकत घेते. मी बीसीसीआयच्या पैशाचा कधीच वापर केला नाही. आतापर्यंत गप्प होते. मात्र आता बोललंच पाहिजे, या भूमिकेतून तिने ट्विटरवर आपली बाजू मांडलीय.