अनुष्का शर्मा इटलीला रवाना, विरानुष्काच्या लग्नाच्या चर्चांना उधाण
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता अनुष्का शर्मा कुटुंबीयांसोबत मुंबई विमानतळावर दिसली. अनुष्का इटलीला जात असल्याची चर्चा आहे.
अनुष्का शर्मा तिच्या आई, बाबा आणि भावासोबत शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावर दिसली. सूत्रांच्या माहितीनुसार अनुष्का इटलीला जात असून, तिथे विराटसोबत तिचं लग्न होणार आहे.
अनुष्का शर्मा तिच्या आई, बाबा आणि भावासोबत शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावर दिसली. सूत्रांच्या माहितीनुसार अनुष्का इटलीला जात असून, तिथे विराटसोबत तिचं लग्न होणार आहे.